ग्रामपंचायत, कोटंबा
ता. सेलू , जि. वर्धा
ISO 9001 : 2015 मानांकित


ग्रामपंचायत, कोटंबा आपले स्वागत करीत आहे.
ग्रामपंचायत कोटंबा बद्दल

सौ. रेणुकाताई रविंद्र कोटंबकार
सरपंच, ग्रा.पं.कोटंबा

श्री. सुहास मनोहर लंगडे
सचिव, ग्रा.पं.कोटंबा
माझं गावचं मंदिर शोभलं !
वर्धा जिल्ह्यातील, सेलू तालुक्यातील, सेलू पासून 7.50 किलोमीटर अंतरावर असलेले, पायथ्यापासून डोंगरापर्यंत अशी रचना असलेले कोटंबा हे गाव आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान 2 ऑक्टोंबर 2011 -12 मध्ये भाग घेऊन गावाची दशा व दिशा पालटण्याची मुहूर्त रोवली. निर्मलग्राम, पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम, तंटामुक्ती, वनश्री, स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त करून सन्मान मिळवला.
गावाची पूर्वस्थिती
पूर्वी गावात सर्वत्र दुर्गंधी व उघड्यावर शौचास जाण्याची सवय होती. सगळीकडे अस्वच्छता, नाल्यांचा अभाव होता. सरपंच रेणुका कोटंबकार यांनी 2009 मध्ये स्वच्छता अभियानात भाग घेऊन बदल करण्याचा निर्धार केला. अनेक उपक्रम राबवून ग्राम विकासासाठी नाते जोडले.
गावाची भौगोलिक स्थिती
कोटंबा गावाची एकूण लोकसंख्या 1155 आहे. 286 कुटुंब संख्या आहे. गावाचे क्षेत्रफळ 782.74 हे. आर असून 626.8 हे. आर लागवडीयोग्य जमीन असून 91.45 हे. आर वनक्षेत्र आहे. बहुतांश जमीन ओलीत असल्यामुळे ऊस, कापूस, गहू, सोयाबीन, तूर ही मुख्य पिके आहेत.
शाळा व अंगणवाडी
गावात जिल्हा परिषदेची शाळा असून 1 ते 7 पर्यंत इयत्ता आहेत. गावातील एक अंगणवाडी असून इमारतीची व्यवस्था आहे.
पिण्याचे पाणी
गाव हे बोर नदीने वेढलेले असून पाण्याच्या पुरवठ्यासाठी विहिरीची व्यवस्था आहे.50000 लिटर पाण्याची टाकी असून नियमित लोकांना पाणी देण्यात येते.
पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम
गावात लोकसंख्येच्या दहापट झाडे लावण्यात आली आहे. सर्व गाव हिरवेगार वृक्षांनी बहरलेले आहे. विविध प्रजातीचे वृक्ष लावलेले असून उद्यान आहे.
ग्रामपंचायतचे नाविन्यपूर्ण उपक्रम
कोटंबा ग्रामपंचायतला ISO 9001 : 2015 नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. एलईडी पथदिवे सर्वत्र लावलेले आहे. सोलर दिव्यांची व्यवस्था आहे.
जानकी संगोपन योजना
सरपंच रेणुका कोटंबकार यांनी स्वतःच्या कल्पनेतून ही योजना काढली आहे. मुलगी झालेल्या महिला व मुलीच्या नावे पोस्टात 18 वर्षापर्यंत पाच हजार रुपये डिपॉझिट केल्या जाते.
रेन वॉटर हार्वेस्टिंग
गावातील शासकीय इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे.
ग्राम उत्सव
गावात श्री. हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, गजानन महाराज व महादेव मंदिर असून वर्षातून एकदा सर्व लोक एकत्र येऊन महाप्रसाद करतात.

संपर्क
ग्रामपंचायत, कोटंबा
ता. सेलू, जि. वर्धा
महाराष्ट्र (भारत) पिन कोड -४४२१०४
संकेतस्थळाला भेटींची संख्या



